राज्यात भयंकर दुष्काळ पडण्याची चाहूल; पाण्याची बचत महत्वाची

राज्यात सध्या काही ठिकाणी हिरवी पिकं आणि पिण्याचं पाणी उपलब्ध असल्याचं पाहायला मिळत असलं तरी आगामी काही दिवसात मोठा जलसंकट उभा राहण्याची चिन्ह दिसत आहेत.

 पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकणातील काही भागात सरासरी इतका पाऊस झाला आहे या पावसामुळे पश्चिम भागातील मोठे प्रकल्प भरले आहेत हा भाग वगळता राज्यात सर्वत्र सरासरीच्या 50 ते 80 टक्के इतका पाऊस झाल्याने पाण्याची परिस्थिती भयंकर आहे.

शहरी भागातील नागरिकांना सध्या शेतावर खरिपाची पीक आणि हिरवळ पाहायला मिळत आहे पाणी हे सर्वत्र उपलब्ध असल्याचे चित्र पाहायला मिळत असले तरी आगामी काही दिवस हे फार खडतर असणार आहेत. पिक हिरवी दिसत असली तरी त्यातून कुठलाही धनधान्य मिळत अशी ती पीक नाहीत एक महिन्यात की पिक शेतात पाहायला देखील मिळणार नाही आणि त्यापासून उत्पन्न मिळालं असंही ऐकायला मिळणार नाही. पाण्याची परिस्थिती देखील अशीच होणार आहे सध्या ज्या भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले पाणी काही दिवसातच अगदी 50% वर येणार आहे.

आपल्या सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन पाण्याची बचत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असं मानून पाण्याचा वापर केला पाहिजे. पाण्याचा अपव्यय होणार नाही याची सर्वांनी काळजी घेणे सध्याची गरज आहे.

पाण्याची उपलब्धता कमी होऊ लागली की ग्रामीण भागातील नागरिक पाण्याची बचत करायला सुरुवात करतात पाण्याचा वापरही सुनियोजित केला जातो शहरी भागात मात्र असे चित्र फारसं पाहायला मिळत नाही नळाचे मुबलक येणार पाणी आपण कसं वापरतो याकडे कोणीही फारसं लक्ष देत नाही आणि पाण्याची बचत करण्याचा विचारही मनात आणत नाही.

शहरातील नागरिकांनी गाड्या धुण्यासाठी भरमसाठ वापरले जाणारे पाणी बंद केलं पाहिजे घराशेजारी असलेल्या बागेला देखील हवं तितकंच पाणी दिलं पाहिजे.

आज आपण सर्वांनी केलेली पाण्याची बचत ही संकटाच्या काळात केलेली पैशाच्या बचतीपेक्षाही मोठी बचत असणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles